Saturday, October 9, 2010

आरती गणपतीची


सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती दर्शनमात्रे मन:कामना पुरती ।। धृ ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा रुणझुणती नूपूरे चरणी घागरिया ।। २ ।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।

आरती देवीची

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ।।

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही । ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंवे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

आरती खंडोबाची


पंचानन हयवाहन सुरभूषन लीला । खंडामंडित दंडित दंडावलीला ॥
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा । करि कंकण बाशिंग सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी राजामल्हारी ।
वारीं दुर्जन वारी तारी सज्जन तारी दंडक अपहारी ॥ धृ ॥

सुरवरसैवरईश्वर वर दे मज देवा । नाना नामे गाईन ही तुमची सेवा ॥
अगणीत गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर श्रमला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरनामस्मरणी शंकर हृदयीं निवाला । तो हा मदनातक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भावे वर्णीला हो भक्ती वर्णीला । रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

आरती मुंजोबाची

सुंदर टोपी मस्तकी कस्तुरीचा टिळक । यज्ञ पावीत अलंकृत यावरी पदक ।।
कटीसूत्राची मौज तेजस्वीकनक । कौपीवंत श्रेष्ठ तेणे प्रतिपालक ।। १ ।।
जयदेव जयदेव जय बटुवरीया स्वारी बटुवरीया चंद्राचे अविधान न कळे तवचरिया ।। धृ ।।

खुळ खुळ वाक्या वाजती घुळघुळ घागरिया । घणघण घंटा नादे दिसती साजरिया ।।
चपचप पाऊल टाकिती दिसती गोजीरीया । देखुनी मुनिजन भावे लागती तव पाया ।। २ ।।

रूप प्रकट करिशी लीला दाखविसी । ज्याला प्रसन्न होसी त्याला बहु सुख देसी ।।
ऐसा तुझा महिमा न कळे कोणासी । तुझी स्तुती वर्णितो राम विजय जोशी ।। ३ ।।

आरती रामाची


नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रुप साजे ॥
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति गाजे । अगाध महिमा तुझा ब्रह्मांडी गाजे ॥ १ ॥

जय देव जय देव जय आत्मायारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ धृ. ॥

बहुरुपी बहुगुणी बहुतां कालांचा । हरिहरब्रह्मादिक देव सकळांचा ॥
युगा युगी आत्माराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥ २ ॥

आरती सदगुरुंची

सुखकर्ता दु:खहर्ता निर्माये कांता । कलिमल दहना गहना स्वामी समर्था ॥
न कळशी ब्रम्हादिक अंत अनंता । तो तो सुलभ जय कृपावंता ।। १ ।।

जयदेव जयदेव जय करुणाकरा आरती ओवाळू सदगुरू माहेरा जयदेव जयदेव ।। धृ ।।

माहेर माहेर विश्रांती ठाव । शब्द अर्थ लागे बोलणे भाव ।।
सदगुरू प्रसादे सुगम उपाव । रामी रामदासा घडला सदभाव ।। २ ।।

जयदेव जयदेव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरू माहेरा जयदेव जयदेव ।। धृ ।।

आरती विठ्ठलाची



युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥ वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥ चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥ रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥

तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥ कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ॥ गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ३ ॥

आरती शंकराची



लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्य सुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ. ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा । ऎसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥ जय देव. ॥ २ ॥

दैवी दैत्य सा़गर मंथन पै केलें । त्यामाजी अवचीत हळहळ सांपडले ॥
तें त्वा असुरपणे प्राशन केले । नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय. ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥

आरती पूर्णानंद स्वामीची

जयदेवं जयदेवं जय त्र्यंबकतनयम् जय त्र्यंबकतनयम् ।।
रंगनाथ नामाभिधानामम् रंगनाथ नामाभिधानामम् पूर्णानंदरूपं जयदेवं जयदेवं ।। धृ ।।

गांधारी तटवासम अर्धगीरीग्रामं अर्धगीरीग्रामं ।
दक्षिणीवाहिनी गंगा दक्षिणीवाहिनी गंगा अधनाधन क्षेत्रम् ।। १ ।।

भस्म विभूशितांगम् व्याघ्रांबर आसनं व्याघ्रांबर आसनं ।
मृगमद केशरभालं मृगमद केशरभालं पितांबर वसनं ।। २ ।।

सन्निध सिद्धिविनायक पश्चिम तटवासं पश्चिम तटवासं ।
शान्तिसदनविहारं शान्तिसदनविहारं भवलय संत्रासं ।। ३ ।।

शरणागत तव चरनं भक्तभयनाशं भक्तभयनाशं ।
गोविंदगान निधानं गोविंदगान निधानं सतत स्मरणीय ।। ४ ।।

आरती मारुतीची


सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं । सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥

जय देव जय देव जय हनुमंता । तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय. देव. ॥ २ ॥

आरती दत्ताची


श्रीगुरुदत्त राजमुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती ।। धृ ।।
ब्रह्मा विष्णू शंकराचा । असे अवतार श्री गुरूचा ।।
कराया उद्धार जगताचा । जाहला बाळ अत्री ऋषीचा ।।
धरीला वेश असे यतीचा । मस्तकी मुकुट शोभे जटीचा ।।
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुत वरुनी तेणे भक्तांचे क्लेश हरूनि
त्यासी करुनी नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती ।। १ ।।
गांणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेची ।
भीमा अमरजा संगमाची, भक्ती असे बहुत सुशिष्यांची ।
वाट दावूनिया योगाची । ठेव देतसे निजभक्तीची ।।
काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भिक्षेला जातो, माहूर निद्रेला वरितो ।।
तरतरतरित छाती धर धरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूल जया हाती ।। ओवाळीतो ।। ।। २ ।।
अवधूत स्वामी सुखानंदा । ओवाळीतो सौख्य कंदा
तारी हा दास न रजकंदा सोडवी विषय मोहछंदा
आलो शरण अत्रीनंदा दावी सदगुरू ब्रम्हानंदा ।।
चुकवी चौर्यान्शीचा फेरा । घालिती षडरिपू मज घेरा, गांजिती पुत्रपौत्रदारा
वदवी भजन मुखी तव पूजन करीत हे सुजन जयाचे बलवन्तावरती ओवाळीतो…

कुलस्वामिनीची आरती


पाटणके चंडिके तुझा रहिवास डोंगरी हो । नाना परीच्या वल्या शोभा देती निरंतरी हो ।
जाई जुई शेवंती प्रीत मोठी पुष्पावारी हो । दिवट्याचे कल्लोळ आपण खेळे महाकाली हो ।।
आदिनाथयोगिनी चंडिका पाटण के स्वामिनी हो पर्वत अवलोकुनी भक्ता अभयकर देऊनी हो ।। धृ ।।

पितांबर नेसलीस पद्मासनी बैसली हो । अंगीची काचोळी केशर बुक्क्याने घोळिली हो ।
वैजयंती माळ कंठी मोतियाची जाळी हो । नागांचे सोपान चरणी घागरी झळाळी हो ।। २ ।।

चुनेगच्ची मंदिर दुरून दिसतसे शिखर हो । धरणाईत बैसले ऋषी ब्राह्मण थोर थोर हो ।
तीर्थाचा महिमा धवल तीर्थ उदक स्थीर हो ब्रम्हार्पण सोडीती भक्त करिती जयजयकार हो ।। ३ ।।

विप्रकुळी जन्म झाला तैसा अवतार धरीला हो । भक्ता जिचा वायुवंश तिने उद्धरिला हो ।
उत्तम त्याचा देह विष्णुलोका प्रति नेला हो विनवितो दास मुद्गल चरणी ठाव देई मला हो ।। ४ ।।

पुरुषोत्तमाची आरती

गोलोक म्हणुनी ध्यातो मी देवा । सुरवर मुनिवर भावे करिती तव सेवा ।।
तव चरणांचा देई अखंड मज ठेवा । पुरुषोत्तमा रक्षी सत्वर वर दयावा ।। १ ।।
जयदेव जयदेव जय पुरुषोत्तमा, केवळ करुणासिद्धी पुरविसी मत्कामा ।। धृ ।।

असंक्रांती मास बहुप्रीय तूते । स्नान नक्त मौन करी उपोषणाते ।।
दीप वस्त्र अन्न देई अपुपाते । अश्वथ पूजा करिता बहु पुण्य होते ।। २ ।।

गोमय गोमुत्र तिलाम्ल स्नान । धरणा पारणा जे करी उद्यापण ।।
भक्ती भावे हो निज संतर्पण । मेहुण सांगून त्या दे वायनदान ।। ३ ।।

तुळस गोसेवा भक्ती जे करिती । मानुनी तुझे रूप अदभूत सुख घेती ।।
करुनी नामस्मरण पूर्वज उद्धरिती । द्वारका लक्ष्मना अंती द्या मुक्ती ।। ४ ।।

आरती महालक्ष्मीची ( जेष्ठा गौरीपूजन )


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी करवीरी तूं विश्वाच्या लक्ष्मी ॥ धृ. ॥
श्रीपति तुझीया योगें श्रीहरिला नाम । ब्रह्मादिकही ध्याती पुरविसी तत्काम ॥
निष्कामें जें भजती पावति निजधामा । योगी ध्याने पावति पद आत्माराम ॥ जय. ॥ १ ॥

जपतपसिद्धी तुजविण कांही साधेंना । प्रसन्न होतां भक्तां भवभय बाधेना ॥
तुजवाचुनिया अंबे शांती लाधेना । वेदांतीचें सारहि शिष्या बोधेना ॥ जय. ॥ २ ॥

गर्जति निगमागम परि वाणिला गौप्य । जें जें वर्णिती तें तें माये तव रुप ॥
कोण करि मग तुझ्या सगुणत्वा माप । स्तवितां सहस्त्र वदनी श्रमला कीं साप ॥ जय. ॥ ३ ॥

दंभे दर्पे माने क्रोधे जे रहित । भजति तव चरणां त्वां साधे आत्महित ॥
उद्धरती ते प्राणीं परिवारासहित । देवी त्याला करिसी श्रीपतिसन्निहित ॥ जय. ॥ ४ ॥

बाधा भवभीतीची तव दासां नाही । माये न करिसि मोहा चंचळ तें कांही ॥
ह्रदयीं अखंड माझ्या तूं सदये राही । गोविंदात्मजविप्रा स्वपदासी पाहीं ॥ जय. ॥ ५ ॥

मंत्रपुष्पांजलि

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासान्।
ते ह नाकं महिमान: सचंत।
यत्र पुर्वे साध्या: संति देवा:।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:।
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्।
पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिती।
तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्सावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति॥