Saturday, October 9, 2010
कुलस्वामिनीची आरती
पाटणके चंडिके तुझा रहिवास डोंगरी हो । नाना परीच्या वल्या शोभा देती निरंतरी हो ।
जाई जुई शेवंती प्रीत मोठी पुष्पावारी हो । दिवट्याचे कल्लोळ आपण खेळे महाकाली हो ।।
आदिनाथयोगिनी चंडिका पाटण के स्वामिनी हो पर्वत अवलोकुनी भक्ता अभयकर देऊनी हो ।। धृ ।।
पितांबर नेसलीस पद्मासनी बैसली हो । अंगीची काचोळी केशर बुक्क्याने घोळिली हो ।
वैजयंती माळ कंठी मोतियाची जाळी हो । नागांचे सोपान चरणी घागरी झळाळी हो ।। २ ।।
चुनेगच्ची मंदिर दुरून दिसतसे शिखर हो । धरणाईत बैसले ऋषी ब्राह्मण थोर थोर हो ।
तीर्थाचा महिमा धवल तीर्थ उदक स्थीर हो ब्रम्हार्पण सोडीती भक्त करिती जयजयकार हो ।। ३ ।।
विप्रकुळी जन्म झाला तैसा अवतार धरीला हो । भक्ता जिचा वायुवंश तिने उद्धरिला हो ।
उत्तम त्याचा देह विष्णुलोका प्रति नेला हो विनवितो दास मुद्गल चरणी ठाव देई मला हो ।। ४ ।।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment