Saturday, October 9, 2010

आरती खंडोबाची


पंचानन हयवाहन सुरभूषन लीला । खंडामंडित दंडित दंडावलीला ॥
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा । करि कंकण बाशिंग सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी राजामल्हारी ।
वारीं दुर्जन वारी तारी सज्जन तारी दंडक अपहारी ॥ धृ ॥

सुरवरसैवरईश्वर वर दे मज देवा । नाना नामे गाईन ही तुमची सेवा ॥
अगणीत गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर श्रमला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरनामस्मरणी शंकर हृदयीं निवाला । तो हा मदनातक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भावे वर्णीला हो भक्ती वर्णीला । रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

No comments:

Post a Comment