Saturday, October 9, 2010

आरती विठ्ठलाची



युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥ वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥ चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥ रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥

तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥ कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ॥ गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ३ ॥

No comments:

Post a Comment